Saturday 2 August 2014

मुंबई - पुणे - मुंबई

मुंबई - पुणे - मुंबई,
माझा प्रवास..............

मुंबई हून आलो पुण्यात ,मित्रान सोभत मज्जा करायचो,
जोब होता SB रोड ला , कर्वे नगर ला आम्ही राहयचो.

कर्वे नगर ची ती संध्या ,आणि तिथला चहा,
तुम्ही कधी तिथे येउन, माहोल तिथला पहा.

शनिवार रविवार गेला फिरण्यात, झालो नाही कधी बोर ,
कधी फिरले झेड ब्रिज, तर कधी FC रोड.

जेवण खानदेश चे घरची आठवण, आणि सुजाता ची मस्त मस्तानी,
आठवतील या सर्व गोष्टी, पुण्या पासून दूर अस्तांनी.

चल आता जाऊ मुंबई, पण मुंबई च काय…………,

बिल्डिंग चे गेट सोडले कि रांगांची रांग लागते,
मग रिक्षा, बस, ट्रेन चे तिकीट काही पण कारण चालते.

रस्त्या वरून चालणारा प्रत्येक माणूस धावत असतो,
मिनिटाला 100 पाऊले असा त्याचा हिशेब असतो.

मुंबई लोकल मध्ये चढणे उतरणे हा सुद्धा एक प्रवास असतो,
तो कोणा वर नसून, पुढे उभ्या असणार्यावर तो अवलंबून असतो.

मग मागच्या ला उतरायचे आहे म्हणून तोही बेफिक्र असतो,
बाहेर पडल्या वर मग तो शर्टाच्या च्या सुरकुत्या मोजतो.

घरी जाण्याच्या विचाराने पण आनंद होतो,
पर्तेकाचा जाण्यचा मार्ग मात्र वेगळा असतो,
प्रेयसी बरोबर समुद्राकाठ किंवा गार्डन मधली किलबिल,
मित्र बरोबर बार नाहीतर किंगफिशर चा छोटा पिंट,
नाहीतर घरी जाऊन क्रिकेट मेच बघण्याची धावपळ.....

मुंबई - पुणे - मुंबई

                                                                                                                   २२ मार्च २०१४
                                                                                                                    हेमंत फेगडे.

1 comment:

  1. "बिल्डिंग चे गेट सोडले कि रांगांची रांग लागते,
    मग रिक्षा, बस, ट्रेन चे तिकीट काही पण कारण चालते."

    जबरदस्त... !!!
    साध्या सरळ शब्दात भेदक वाक्यरचना

    ReplyDelete